Sangvi Crime News : पादचारी महिलेचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेच्या हातातील मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 5) रात्री डीपी रोड, विशालनगर, पिंपळे निलख येथे घडली.

पद्मा माल्याद्री रेड्डी (वय 48, रा. डीपी रोड, विशालनगर, पिंपळे निलख) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविवारी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास डीपी रोड, विशालनगर, पिंपळे निलख येथून पायी जात होत्या. त्या मिल्क अँड मोर डेअरी समोर आल्या असता दुचाकीवरून दोन अनोळखी चोरटे आले. त्यातील मागे बसलेल्या चोरट्याने फिर्यादी यांच्या हातातील सहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.