Sangvi : माहेरहून 70 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे माहेरहून 70 लाख रुपये आणण्याची मागणी. यासाठी विवाहितेने नकार दिला असता सासरच्या लोकांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. याबाबत सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 36 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रमोद कुमार प्रजापती, जिन्नू प्रसाद प्रजापती, सुशीला देवी प्रजापती, पूनम देवी प्रजापती, राजेश कुमार प्रजापती (सर्व रा. मीठापुर, दिल्ली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी महिलेकडे घर खरेदी करण्यासाठी माहेरहून 70 लाख रुपये आणण्याची मागणी केली. यासाठी महिलेने नकार दिला असता सासरच्या मंडळींनी महिलेस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार जुलै 2008 ते एप्रिल 2019 या कालावधीत घडला. याबाबत महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. पोलीस उपनिरीक्षक पन्हाळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.