Sangvi : पैशांसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -विवाहितेकडे पैशांची मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन 2011 ते 7 जानेवारी 2020 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी 30 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती गुणवंतराव पाटील (36), सासू शकुंतला पाटील (वय 60), दीर वसंतराव पाटील (वय 32), नणंद धन्वंती शिंदे (वय 38), नणंदेचे पती चंद्रकांत शिंदे (वय 45) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी विवाहितेकडे वारंवार पैशांची मागणी केली. विवाहितेला तिच्या मुलीपासून वेगळे ठेवले. हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच विवाहितेच्या भावाला देखील फोनवरून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.