Sangvi News :सांगवी गोळीबार प्रकरण! दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव मधील काटेपुरम चौकात भर दिवसा एका सराईत गुन्हेगाराचा दुस-या सराईत गुन्हेगाराने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून गोळ्या घालून खून केला. ही घटना शनिवारी (दि. 18) सकाळी घडली. या गुन्ह्यातील दोघांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

गणेश बाजीराव ढमाले, अक्षय केंगले (दोघे रा. सांगवी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह गणेश हनुमंत मोटे, अश्विन आनंदराव चव्हाण, अभिजित बाजीराव ढमाले, प्रथमेश लोंढे, गणेश उर्फ मोनू सपकाळ, निखिल उर्फ डोक्या अशोक गाडुते, राजन उर्फ बबलू रवी नायर, महेश तुकाराम माने, निलेश मुरलीधर इयर (सर्व रा. सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश रवींद्र जगताप (वय 36, रा. पिंपळे गुरव) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याचा भाऊ जितेश रवींद्र जगताप (वय 25, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून कट रचला. परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून योगेश जगताप याच्यावर गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेल्या योगेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटना घडल्यानंतर आरोपी पळून गेले. पोलिसांनी पथके तयार करून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. सांगवी मधून गणेश ढमाले आणि अक्षय केंगले या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपीच्या मागावर देखील पोलीस पथके रवाना करण्यात आली असल्याचेही टोणपे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.