Sangvi News : घरासमोर गाडी लावल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज – घरासमोर गाडी लावल्याच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एका महिलेला कोयत्याने मारून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 3) दुपारी सव्वाबारा वजता समता नगर, नवी सांगवी येथे घडली.

वर्षा सुभाष पवार (वय 36, रा. नवी सांगवी) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दत्तात्रय पाटील, त्याची आई (नाव माहिती नाही), आशा शरद हेगडे (सर्व रा. समता नगर, नवी सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी फिर्यादी वर्षा यांनी आरोपींच्या दारात गाडी लावली. या कारणावरून आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी वर्षा यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच लोखंडी कोयत्याने मारून ढकलून दिले. यामध्ये वर्षा जखमी झाल्या आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.