Sangvi : आईस्क्रीम पार्लरवरील फालुद्यात आढळली “ब्लेड”!

एमपीसी न्यूज – ग्राहकाने आइस्क्रीम पार्लरमधून फालुदा घेतला. त्यामध्ये ब्लेड आढळली. ही घटना 1 सप्टेंबर रोजी रात्री पिंपळे सौदागर येथे घडली. याबाबत आईस्क्रीम पार्लर चालकाने निष्काळजीपणा केल्याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रतन गाडरी (रा. पिंपळे सौदागर) या आईस्क्रीम पार्लर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनोज सुरेश अहुजा (वय 31, रा. पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रतन याची पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉनसमोर सार्वजनिक रोडच्या बाजूला आईस्क्रीम पार्लरची गाडी आहे. 1 सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी मनोज आरोपीच्या गाडीवर आईस्क्रीम खाण्यासाठी आले. मनोज यांनी फालुदा ऑर्डर केला.

फालुदा खात असताना फालुदामधून मनोज यांच्या तोंडात ब्लेड आढळली. याबाबत दुकानदार रतन याने निष्काळजीपणा केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.