Sangvi : पवना नदीत आढळला तरुणाचा मृतदेह

एमपीसी न्यूज – पवना नदीत सडलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या रहाटणी उपविभागाचे जवानांनी हा मृतदेह बाहेर काढला. ही घटना आज, मंगळवारी (दि. 4) सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास रहाटणी उपविभागाला माहिती मिळाली की, पवना नदीमध्ये सांगवी येथे एक मृतदेह पाण्यावर तरंगत आहे. त्यानुसार, फायरमन मनोज मोरे, विलास पाटील, विशाल पोटे यांना घेऊन वाहन चालक अमोल रांजणी यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. एक तासाच्या अथक परिश्रमानंतर जवानांनी तरुणाचा मृतदेह नदीतून बाहेर काढला.

मृतदेह आढळलेल्या तरुणाचे वय सुमारे 25 आहे. तरुणाची ओळख पटलेली नाही. पवना नदीचे पाणी वाहन नाही. त्यामुळे हा मृतदेह वाहत आला नसल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे. तसेच मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी मृतदेह पाण्यात पडल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.