Maval Crime News : इंद्रायणी नदीत मृतदेह आढळलेल्या तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीच्या पात्रात रविवारी (दि. 2) मृतदेह आढळलेल्या तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संकेत उर्फ गणेश नवनीत सोनवणे (वय 24, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी इंद्रायणी नदीच्या पात्रात कातवी उड्डाणपुलाजवळ एक मृतदेह आढळला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाची ओळख पटविण्यात आली आहे.

मयत संकेत याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. त्याला त्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. 22 सप्टेंबर रोजी तो कारागृहातून बाहेर आला होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्याच्या खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.