Sangvi : स्पायसर स्कूल ते समर्थ पेट्रोलपंप रस्त्यावर वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी 

एमपीसी न्यूज – सतत वाहनांची वर्दळ असलेल्या स्पायसर स्कूल ते साई समर्थ पेट्रोलपंप दरम्यान वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. मात्र, या रस्त्यावर वाहतूक नियमन करण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात नसल्याने वाहन चालकांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस बेशिस्त वाहतूक वाढत आहे. त्यामुळे याठिकाणी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. 
स्पायसर स्कूल ते साई समर्थ पेट्रोलपंप हा रस्ता पिंपरी महापालिका आणि पुणे महापालिकेला जोडणारा दुवा आहे. सांगवी, दापोडी, पिंपळे-गुरव, पिंपळे-सौदागर या भागातील नागरिकांना पुण्यात जाण्या-येण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होतो. त्यामुळे या रस्त्यावर सतत रहदारी असते.

  • स्पायसर स्कूलच्या बस रस्त्यातच उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे या चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. वाहनांची वर्दळ असताना आणि वाहतूक कोंडी होत असताना या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात नसतात, अशा तक्रारी सामाजिक कार्यकर्ते रमण तिलवानी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.