Sanjay Ghodawat Group : घोडावत कंझ्युमरने कूलबर्ग नावाचे नॉन अल्कोहोलिक बिअर स्टार्टअप घेतले विकत

एमपीसी न्यूज  : संजय घोडावत ग्रुप (एसजीजी) च्या एफएमसीजी शाखा घोडावत कंझ्युमर लिमिटेड (जीसीएल) ने मुंबई स्थित कूलबर्ग स्टार्टअप विकत घेतले आहे, जे माल्ट-आधारित लज्जतदार नॉन अल्कोहोलिक बिअर ऑफर करतात. (Sanjay Ghodawat Group) 2016 मध्ये पंकज असवाणी व याशिका केसवाणी यांनी स्थापन केलेले कूलबर्ग हे भारतातील माल्ट-आधारित नॉन अल्कोहोलिक बिअरचे प्रणेते आहेत आणि 200 हून अधिक शहरांमध्ये आणि 10 देशांमध्ये त्याचे वितरण करण्यात येत आहे. 

2013 मध्ये स्थापन झालेल्या, जीसीएल ने सतत उत्पादनात नावीन्यता आणून ग्राहक-केंद्रितता, परवडण्याची क्षमता आणि गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामुळे स्वतःसाठी एक अद्वितीय ब्रँड ओळख निर्माण केली आहे. जीसीएल ने खाद्यतेलाचे उत्पादन करून आपला प्रवास सुरू केला आणि ग्राहकांची वाढती स्वीकृती, विश्वास आणि लक्षणीय यश मिळवून, कंपनीला स्टेपल्स, इंपल्स, होम-केअर आणि पर्सनल केअर श्रेणींचा समावेश केला. यामुळे उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासाठी आणि वैविध्य आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळाले. जीसीएल ने अलीकडेच आर्थिक वर्ष 22 मध्ये महसुलात रू. 1,400 कोटींचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे आणि आर्थिक वर्ष 23 पर्यंत 2000 कोटी गाठण्याचे लक्ष ठेवले आहे. जीसीएल चे यश हे जागतिक दर्जाच्या उत्पादन सुविधामध्ये दडलेले आहे, मोठ्या प्रमाणावर ग्रामीण आणि शहरी प्रवेश, कार्यक्षम ट्रेड मार्केटिंग, वितरण नेटवर्क आणि व्यावसायिक नीतिमत्ता ही अल्पावधीतच हे विलक्षण पराक्रम साध्य करण्याचे प्रमुख चालक घटक आहेत.

कूलबर्ग जीसीएलच्या इंपल्स विभागाचा भाग बनेल आणि अख्या जगात त्याच्या श्रेणीतील सर्वात मोठा ब्रँड बनण्याचे उद्दिष्ट आहे. कूलबर्गची संपूर्ण टीम जीसीएल मध्ये समाविष्ठ होईल आणि नवीन-युगातील प्रीमियम पेय ब्रँड्सचा पोर्टफोलिओ विकसित करण्याच्या लक्ष्याकडे वाटचाल करेल.

Pune News : दुरुस्तीच्या कामामुळे डेक्कन व शिवाजीनगर परिसरात काही काळ वीजपुरवठा राहणार बंद

जीसीएल चे व्यवस्थापकीय संचालक श्रेणिक घोडावत म्हणाले, “कूलबर्गमधील आमची गुंतवणूक ही जागतिक स्तरावर जीवनमान वाढवण्याच्या आमच्या वचनबद्धतेची साक्ष आहे. ग्राहकांनी दिवसभरात जीसीएल चे किमान एक उत्पादन वापरावे हे आमचे ध्येय आहे. आम्ही या भागीदारीबद्दल उत्साहित आहोत कारण कूलबर्गने नॉन अल्कोहोलिक बिअर उद्योगात स्वतःसाठी एक विशिष्ट नाव निर्माण केले आहे.(Sanjay Ghodawat Group) आम्ही कूलबर्गच्या अत्यंत अनुभवी टीमसोबत काम करण्यास उत्सुक आहोत कारण आम्हला पुढे जाऊन आमच्या या व्यवसायाचा विस्तार करायचा आहे. आम्हाला खात्री आहे की ही भागीदारी ब्रँडला यशाच्या नवीन उंचीवर घेऊन जाईल आणि जगभरात एक अग्रगण्य नाव बनवेल.”

कूलबर्गच्या सह-संस्थापिका याशिका केसवाणी म्हणाल्या, “कूलबर्ग हा एक जीवनशैली ब्रँड आहे ज्याने त्याच्या ग्राहकांमध्ये एक मजबूत निष्ठा निर्माण केली आहे. या भागीदारीमुळे, आम्ही आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्रँडच्या वाढीला गती देण्याचे ध्येय ठेवत आहोत.”

जीसीएल मजबूत मूलभूत तत्त्वांवर उभारले गेले आहे आणि ते दररोज लाखो ग्राहकांच्या जीवनाला स्पर्श करते. या प्रवासाचा एक भाग असल्याचा आणि पेयांच्या ब्रँडसाठी एक मजबूत इकोसिस्टम तयार करण्याचा आम्हाला आनंद होत आहे,” असे पंकज असवाणी म्हणाले.

कूलबर्ग पेये काचेच्या बाटल्यांमध्ये तसेच कॅनमध्ये दिली जातात आणि सध्या 6 अद्वितीय माल्ट-आधारित स्वादांमध्ये दिली जातात. हा ब्रँड ओम्नी चॅनेल चालवतो आणि ऑनलाइन मार्केटप्लेस आणि द्रुत वाणिज्य तसेच सुपरमार्केट, उपहारगृहे, महाविद्यालये, विमानतळ इत्यादींवर विक्री करतो. ब्रँडचा दावा आहे की तो आज 50,000 पेक्षा जास्त आउटलेट्सपर्यंत पोहोचला आहे आणि पुढील एक-दोन वर्षांमध्ये 1,00,000 पेक्षा जास्त आउटलेट्सपर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट आहे.

संजय घोडावत ग्रुप बद्दल माहिती

संजय घोडावत ग्रुप (एसजीजी) हा एक प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक समूह आहे ज्याची विविध उच्च-मूल्याच्या व्यवसायांत उपस्थिती आहे. एव्हिएशन, ग्राहक उत्पादने, शिक्षण, ऊर्जा, खाणकाम, स्थावर मालमत्ता, फुटकळ विक्री आणि टेक्सटाईल हे त्याचे काही प्रमुख व्यवसाय कार्यक्षेत्र आहेत.(Sanjay Ghodawat Group) एसजीजी ची स्थापना 1993 मध्ये झाली आणि तेव्हापासून तिचे संस्थापक आणि अध्यक्ष- संजय घोडावत यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाखाली त्याची प्रभावी वाढ झाली आहे. या समूहाकडे जागतिक स्तरावर लाखो ग्राहक आहेत, 10,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि 16,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. एसजीजी मोठ्या जोमाने पुढे जात आहे आणि उच्च दर्जाच्या उत्पादनांच्या आणि सेवांच्या विस्तृत श्रेणीसह लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.