Pune News: 31 डिसेंबरपर्यंत सातारा – पुणे जुन्या कात्रज घाटात एकेरी वाहतूक

एमपीसी न्यूज : कात्रज शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग क्र. 126 (जुना कात्रज घाट) कि.मी. 12/00 ते 20/200 या लांबीत घाट रस्त्याचे डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम करण्यात येत असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार 31 डिसेंबरपर्यंत सातारा ते पुणे जुन्या कात्रज घाटातून पुण्याकडे येणारी वाहतूक बंद करून ती नवीन बोगद्यातून दरीपूल मार्गे पुण्याकडे वळविण्यात आली आहे.

Pune News: अग्निवीर जनरल ड्युटीच्या निवडीसाठी पुण्यात 6 डिसेंबर रोजी भरती मेळावा

पुणे ते सातारा अशी कात्रज घाटतून एकेरी वाहतुक सुरु आहे. वाहनधारकांनी साताऱ्याकडून पुण्याकडे येताना नवीन बोगद्यातून यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंडळ अधीक्षक अभियंता ब. नि. बहिर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.