Satyam Jewellers : खास लग्न सराईसाठी सत्यम ज्वेलर्स घेऊन आले आहेत दागिन्याच्या घडणावळीवर 25 % सूट

एमपीसी न्यूज – सध्या लग्नाचा सिजन सुरु आहे. त्यात (Satyam Jewellers)लग्न समारंभात इतर सर्व गोष्टीच्या खरेदीमधील महत्वाची ठरते ती सोन्याच्या दागिन्यांची खरेदी. मात्र सोन्याचा भाव त्यात दागिन्यांची घडणावळीचा दर यात ग्राहक नेहमी कात्रीत सापडतो. ग्राहकांची ही अडचण लक्षात घेता सत्यम ज्वेलर्स खास ग्राहकांसाठी ऑफर घेऊन आले आहे. लग्नाच्या सिजनमध्ये तुम्ही सत्यम ज्वेलर्स मधून दागिने खरेदी केले तर तुम्हाला दागिन्यांच्या घडणावळीवर चक्क 25 टक्क्यांची घसघशीत सूट मिळणार आहे.

आपल्या पिंपरी-चिंचवड परिसरातील नामवंत व जुनी पेढी म्हणजे सत्यम ज्वेलर्स. सत्यम ज्वेलर्स ने यंदा आपल्या 40 व्या वर्षात पदार्पण केले आहे . सचोटी, ग्राहकांचा विश्वास, रास्त मजुरी आणि ग्राहकांच्या मनात घर करेल अशी भरपूर डिझाइन्सची व्हरायटी यांच्या जोरावर आम्ही यंदा 40 व्या वर्षात पदार्पण केले आहे अशी भावना सत्यम ज्वेलर्स चे सर्वेसर्वा किरणराज चोपडा यांनी व्यक्त केली.

Maharashtra : राज्यातील कारागृहावर आता ड्रोनची नजर; 12 ड्रोन द्वारे विविध कारागृहावर ठेवली जाणार नजर

यंदाच्या लग्न समारंभासाठी सुवर्ण खरेदी करताना ग्राहकांचा विचार करून आम्ही एक आगळीवेगळी ऑफर सर्वासाठी देत आहोत, सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर चक्क 25 % सूट. हि सूट कॅश बॅक स्वरूपात असेल आणि हि योजना दि. 16 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 पर्यंत सुरु असेल अशी माहिती महावीर चोपडा यांनी दिली.

सोन्याच्या भावात सतत होणारी वाढ परंतु लग्नसराई असल्यामुळे सोन्याची खरेदी तर करावी लागणार अश्या महागाईच्या कात्रीत सापडलेल्या आमच्या सर्व ग्राहकांचा तब्बल 25% फायदा होईल आणि 40 वर्षे पूर्तीनिमित्त ही ग्राहकांना आमच्या कडून सप्रेम भेट आहे. आमच्या निगडी, कृष्णानगर व चाकण ह्या तिन्ही शाखांमध्ये हि ऑफर उपलब्ध आहे .

ह्या ऑफरद्वारे पारंपारिक चपलाहार, कोल्हापुरी साज, ठुशी अश्या मराठमोळ्या दागिन्यांच्या बरोबरीनेच आधुनिक दागिन्यांमध्ये छोटे मंगळसूत्र, नवजात मुला-मुलींचे दागिने ते वधू-वरांचा साखरपुडा किंवा लग्नापर्यंतच्या  अश्या विविध डिझाइन्समधील दागिने आपण मनसोक्त खरेदी करू शकता. एवढंच नाही तर भारताच्या विविध राज्यांमधली कलात्मकता लक्षात घेऊन पोलकी, जडाऊ, अँटिक, कुंदन या व अश्या अनेक दागिन्यांची (Satyam Jewellers) कलाकृतीही आमच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे अशी माहिती दीपक व राहुल चोपडा यांनी दिली आहे.

शुद्ध सोने, ग्राहकांचा विश्वास जपणारी माणसं, नाविन्य जपणारे दागिने व त्यात भरगोस सूट मग अजून काय हवय लग्नाच्या सोने खरेदीला…? लवकरच आपल्या जवळच्या सत्यम ज्वेलर्सच्या शाखेला भेट द्या आणि ऑफरचा लाभ घ्या.

अधिक माहिती साठी संपर्क

सत्यम ज्वेलर्स –

कोहीनूर आर्केड,मुंबई-पुणे रोड टिळक चौक,

निगडी बसस्टॉपच्या विरुद्ध बाजूला, निगडी

संपर्क क्रमांक 8983088880

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.