Pimpri : नेहरूनगरमध्ये सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – इमारतीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केली. ही घटना नेहरूनगर, पिंपरी येथे आज, गुरुवारी (दि. 12) सकाळी उघडकीस आली.

भीम थापा (वय 32, रा. नेहरूनगर, पिंपरी), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरुनगर येथे एका इमारतीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी थापा हे काम करीत होते. त्यांनी लिफ्टच्या डक्टवर लोखंडी शिडी आडवी लावली. त्या शिडीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.