Chakan Crime News : सिक्युरिटी ट्रेनिंग ऑफिसरकडून कंपनीच्या सिक्युरिटी गार्डला मारहाण

एमपीसी न्यूज – सिक्युरिटी ट्रेनिंग ऑफिसरला ड्युटी रजिस्टर दाखवले नाही तसेच कॉन्ट्रॅक्टरला इन्व्हाईसचे फोटो काढू दिले, या कारणावरून सिक्युरिटी ट्रेनिंग ऑफिसरने एका सिक्युरिटी गार्डला शिवीगाळ करत हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 24) दुपारी दीड वाजता फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स फोर्जिंग कंपनी खालूंब्रे येथे घडली.

शांताराम उदयभान गवई (वय 41, रा. चाकण) असे मारहाण झालेल्या सिक्युरिटी गार्डचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिक्युरिटी ट्रेनिंग ऑफिसर संदीप आवटी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच कंपनीत कामाला आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये एकेदिवशी फिर्यादी यांनी ड्युटी रजिस्टर आरोपीला दाखवले नाही. त्याचा आरोपीच्या मनात राग होता. त्यावेळी त्याने फिर्यादी यांना तुला पाहून घेतो, अशी धमकी दिली होती.

23 जानेवारी रोजी कॉन्ट्रॅक्टर नवनाथ बोत्रे कंपनीच्या गेटवर आला. त्याला इन्व्हाईसचे फोटो का काढू दिले, तुला अक्कल नाही का. तू कोणाला विचारून इन्व्हाईसचे फोटो काढून दिले, असे बोलून आरोपीने फिर्यादी यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर कंपनीच्या सिक्युरिटी केबिनमध्ये फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.