Shanivarwada Crime : मारहाण करत लुटणाऱ्यांना नागरिकानेच पकडले

एमपीसी न्यूज – मारहाण करून लुटणाऱ्यांना पाठलाग करून नागरिकानेच पकडले. ही घटना शनिवारी (दि.8) शनिवारवाडा (Shanivarwada Crime) येथे घडला.

केशव गणेश कठायर (वय 22, रा. मुळ नेपाळ), अलेक्स वाननिवमी (वय 23, रा.नागालँड), कृष्णा तुलबहादुर झरगा (वय 34, रा. नेपाळ) हे सर्व शनिवारवाडा येतील फुटपाथवर रहात होते. याप्रकरणी साहेब मिलन मल्लीकरा (रा. हडपसर) यांनी फरसखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ज्येष्ठ राजकारणी मुलायम सिंह यादव यांचे निधन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित नागरिक हे शनिवारवाडा पाहण्यासाठी आले होते. यावेळी फिर्यादी फुटपाथवरून जात असताना आरोपी तेथे आले व त्यांना अडवून हाताने मारहाण करू लागले. यावेळी त्यांनी फिर्यादीच्या खिशातील मोबाईल फोन घेऊन पळून जाऊ लागले. यावेळी फिर्यादी यांनी त्यांचा पाठलाग करून इतर नागरिकांच्या मदतीने आरोपींना पकडून ठेवले. पोलिसांना कळवले असता पोलीस तेथे गेले व त्यांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता (Shanivarwada Crime) आरोपीकडून हजार रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याचा पुढिल तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.