ज्येष्ठ राजकारणी मुलायम सिंह यादव यांचे निधन

एमपीसी न्यूज : ज्येष्ठ राजकारणी आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे आज सकाळी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.

मुलायम सिंह यादव यांना युरिनरी इन्फेक्शन, ब्लड प्रेशरची समस्या आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

मुलायम सिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई गावात झाला. त्यांचे वडील साखरसिंह यादव हे शेतकरी होते. मुलायमसिंह यादव सध्या मुलायमसिंह मैनपुरी मतदारसंघातून लोकसभेचे खासदार होते. उत्तर प्रदेशचे राजकारण असो, देशाचे राजकारण असो, मुलायमसिंह यादव यांची गणना प्रमुख नेत्यांमध्ये केली जायची. ते तीन वेळा यूपीचे मुख्यमंत्री होते आणि केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्रीही राहिले आहेत. याशिवाय मुलायम सिंह 8 वेळा आमदार आणि 7 वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

Russia VS Ukraine : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता; एअर अलर्ट जारी

मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांनी दोन विवाह केले. त्यांची पहिली पत्नी मालती देवी, ज्यांचे मे 2003 मध्ये निधन झाले, त्या अखिलेश यादव यांच्या आई होत्या. मुलायम यांनी साधना गुप्ता यांच्याशी दुसरे लग्न केले. मुलायम सिंह आणि साधना यांच्या मुलाचे नाव प्रतीक यादव आहे. नुकतेच साधना यांचे देखील निधन झाले होते. मुलायम सिंह यादव यांच्या निधनाने समाजवादी पक्षामध्ये पोकळी निर्माण झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.