Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर मोक्का

एमपीसी न्यूज –  गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार ( Sharad Mohol ) यांच्यासह 16 आरोपींविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मोहोळचा खून 5 जानेवारी रोजी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता.

Pune : शोभायात्रेच्या रूपात घडले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

याप्रकरणी गुन्हे शाखेने साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांना अटक केली.

तपासात गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपींविरुद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कारवाईचे आदेश दिले. गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सुनील तांबे तपास करत आहेत.

मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणेच्या मागावर गुन्हे शाखेची पथके आहेत. अद्याप मारणेचा ठावठिकाणा पोलिसांना लागलेला नाही. विठ्ठल शेलारसह सर्व आरोपींची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली ( Sharad Mohol ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.