Sharad Pawar News : शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट; बारामतीत दोघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात ट्विटरवर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्यप्रकरणी दोन ट्विटर खातेधारकांविरोधात बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

vedashree@vedashree_19 आणि raje harshwardhan Shastri या खातेधारकांना विरोधात बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले अभिजित जाधव यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांना त्यांच्या एका मित्राने ट्विटरवर शरद पवार यांच्या विषयी एका मुलीने बदनामीकारक मजकूर लिहिला असल्याची माहिती दिली होती. शरद पवार यांच्या छायाचित्रासह प्रसिद्ध केलेला या ट्विटला राजे हर्षवर्धन नामक खातेधारकाने दिलेल्या प्रतिक्रियेतही पवार यांच्याबद्दल बदनामी केल्याचे जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.