Shirgaon : दारूभट्टी लावल्या प्रकरणी महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेने दारूभट्टी लावल्या प्रकरणी (Shirgaon) तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिच्या दारूभट्टीवर छापा मारून कारवाई करत तीन लाख 20 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 23) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर करण्यात आली.

पोलीस अंमलदार समाधान फडतरे यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 45 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PMRDA : शिवजयंती उत्सवासाठी भूखंड राखीव ठेवण्याकरिता जरांगे-पाटील यांना साकडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर आरोपी महिलेने एक खड्डा खोडून त्यात दारूभट्टी (Shirgaon) लावली. याबाबत शिरगाव पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दारू भट्टीवर छापा मारून कारवाई करत तीन लाख 20 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.