Pune : स्थायी समिती अध्यक्षांच्या बजेटवर शिवसेना – मनसेची टीका

एमपीसी न्यूज – स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सादर केलेल्या 7 हजार 390 कोटी रुपयेच्या अंदाजपत्रकावर शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार आणि मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी टीका केली.

पृथ्वीराज सुतार म्हणाले, टेंडर प्रक्रिया लवकर लावावी. घाईघाईने काम होत असल्याने कामाचा दर्जा राहत नाही. अजूनही पैसे शिल्लक आहेत, पण कामे सुरू झाले नाही. ही कामे वेळेत सुरू व्हावी. महापालिकेचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाचे हॉस्पिटल प्रशासनाने का केले नाही. 2017 मध्ये राज्य शासन तुमचे होते. आता 3 महिन्यांत हे हॉस्पिटल होत नसल्याची ओरड कशासाठी करता, आजच्या इतिहासात सर्वात मोठे बजेट आहे.

आम्ही मागच्या वेळी सत्तेत तुमच्या बरोबर असलो तरी नागरिकांच्या समस्यांसाठी विरोध केला. 2200 टन कचरा प्रक्रिया करणार असल्याचे सांगितले. पण, शहरात किती कचरा जमा होतो, हे सांगितले नाही. किती कचऱ्याचे प्रोजेक्ट बंद पडले, 50 टनापासून 500 टनापर्यंत कचऱ्याचे प्रोजेक्ट बंद पडले. 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना म्हणजे 24 तास पाणी मिळेल असे सांगितले होते.

आता मात्र, समान पाणीपुरवठा म्हणता, याचा अर्थ 4 तासच पाणी देणार, म्हणजे 24 तास पाणीपुरवठा योजना गुंडाळली. 1987 मध्ये एचसीएमटीआर रस्ता आखण्यात आला होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा रस्ता आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी सद्यस्थितीचा विचार करा. जायकामध्ये 4 पॅकेज होते. 56 टक्के काम कसे अबोव्ह आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, एचसीएमटीआर आणि जायका या तीन गोष्टीत महापालिका बदनाम झाली. 12 वर्षे झाले शिवणे – खराडी रस्त्याचे काम सुरूच आहे.  प्रोजेक्टसाठी काही तरी टाईम आखून दिला पाहिजे.

10 रुपयांत मिडी बसने प्रवास ही चांगली योजना आहे. लोकांना बस प्रवास फुकट द्या. आपण तूट भरून देतोय पण ते सुधारणा काय करतात, पीएमपीएमएल मोफत चालवायला काय खर्च येणार, 500 कोटी तूट देतो, आणखी 500 फुकट द्या, स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना 2 – 2 लाख आपण पगार देतो, पण काम काय करतात. स्मार्ट सिटी पूर्ण शहरात राबविण्याची आम्ही मागणी केली होती. अन्यथा त्या भागाला स्मार्ट नाव द्या. कोथरूडला स्मार्ट म्हणा, अशी मागणी केली होती. रस्ते, फुटपाथ असेच काम बाणेर – बालेवाडी भागांत चालले. 4 किमी रस्त्यावर 22 कोटी रुपये खर्च केले. ही उधळपट्टी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

वसंत मोरे म्हणाले, 2007 – 2009 दरम्यान स्थायी समिती सदस्यांना 2 ते 3 कोटी मोठे बजेट होते. कात्रज तलावावर 10 कोटी रुपये खर्च केले. महापालिकेच्या पावणे तीन हजार विद्यार्थी आहेत. दवाखाना उभारला. या तीन वर्षांत मला सर्वात जास्त बजेट मिळाले. भुयारी मार्गांची अवस्था अत्यंत वाईट आहे. एचसीएमटीआर हा प्रकल्प कागदावरच आहे. त्यासाठी 172 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. बीआरटी बंद तरी करून टाका, त्यावर अंतिम चर्चा करा, 19 ठिकाणी उड्डाणपूल करतायेत, खडकवासला ते स्वारगेट सायकल ट्रॅक कशासाठी, तिथे चालत येत नाही, पुणे शहरात चालत असलेल्या सायकल ट्रॅकवर काम करा. 158 किमीचे नाले आहेत. 38 हजार 81 चेंबर्स, 7.50 कोटी बजेट ही चेष्टा आहे. सालाबादप्रमाणे तेच ते प्रकल्प सांगतात, ते कधी तरी पूर्ण होणार का, शिवनेरी सहल आयोजित करता मग शनिवारवाडाकडे दुर्लक्ष का करता, असा सवाल वसंत मोरे यांनी केला.

शनिवारवाडा माझ्या प्रभागात असता तर मी जगाच्या पाठीवर नेऊन ठेवला असता, स्मार्ट व्हिलेज नेमके काय करणार, स्मार्ट सिटीचे काही झाले नाही, बालगंधर्व रंगमंदिर विकासासाठी 5 ते 6 कोटी खर्च होतात, राजीव गांधी उद्यानातून मागील वर्षी साडेआठ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. आणखी उत्पन्न वाढविण्यासाठी रोप वे गरजेचे आहे. 25 सप्टेंबरच्या पुरात महापालिकेने काहीही काम केले नाही. दुसरा पावसाळा आला, पण ओढ्यातील गाळ काढण्यात आला नाही. भिलारेवाडी भागात तलाव वाढविला तर कात्रज – धनकवडी भागांत पाण्याची सोय होणार आहे. शहरात भिंती रंगविण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ते कुठे तरी थांबवा. नगरसेवकांचे 5 कोटी 40 लाख रुपये राडारोडा उचलण्यासाठी दिले. पण, आम्हाला काहीही निधी दिला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.