Shivajinagar : ‘अवि भाई किंग’ म्हणत तरुणीचा भर रस्त्यात विनयभंग

एमपीसी न्यूज : रस्त्याने दुचाकीने जाणाऱ्या तरुणीची (Shivajinagar) दुचाकी भर रस्त्यात अडवून तिच्यासोबत अश्लील चाळे करत विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडला. शिवाजीनगर गावठाणात 31 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. या प्रकरणी एका वीस वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह चौघाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आदित्य वडस्कर (रा. बहिरट अळी शिवाजीनगर गावठाण), आयुष गायकवाड, विशाल शंकर सिंह आणि तन्मय गुजर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील आदित्य आणि विशाल हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना अटक केली.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी हे (Shivajinagar) एकमेकांच्या परिचयाच्या आहेत. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता फिर्यादी या दुचाकीय जात असताना आरोपी आदित्य याने त्यांची दुचाकी अडवली. “आता लक्ष 2023, 2023 चा बादशहा मीच, बदला अभी बाकी है” असे म्हणून फिर्यादीच्या डाव्या हाताला स्पर्श करून डाव्या हातावरून मानेपर्यंत हात फिरवला. त्याच्यासोबत असलेल्या इतर आरोपींनी घडलेला प्रकार पाहून अवि भाई किंग ऑफ गावठाण असे म्हणून त्याला प्रोत्साहन दिले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Pune : अभियंत्याच्या निष्काळजीपणामुळे 14 वर्षीय मुलाचा करंट लागून मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.