Pune : ग्रामपंचायत निवडणूकीचा खर्च सादर करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज : जिल्ह्यात 18 डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये (Pune) खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रेची कारवाई सुरू करण्यात येणार असून 20 जानेवारीपर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये 18 डिसेंबर 2022 रोजी 221 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीचा निकाल 23 डिसेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला आहे. या निवडणूकीमध्ये सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या 2 हजार 74 जागांसाठी 3 हजार 532 उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. तसेच 761 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत.

निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या एकूण 4 हजार 293 उमेदवारांनी त्यांचा निवडणूकीच्या खर्चाचा हिशेब 20 जानेवारीपर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसिल कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह जमा करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशोब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या निवडणूकीच्या खर्चाचा (Pune) हिशेब तातडीने सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी केले आहे.

Shivajinagar : ‘अवि भाई किंग’ म्हणत तरुणीचा भर रस्त्यात विनयभंग

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.