Thergaon – थेरगावमध्ये शिवजयंतीनिमित्त ‘ग्रीन्स’ वासियांचे ध्वजनृत्य

एमपीसी न्यूज – थेरगाव, चिंचवड येथील ग्रीन्स संकुलातील ग्रीन्स मराठी, साहित्य, संगीत व कला मंडळातर्फे शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ग्रीन्स वासियांनी ध्वजनृत्य करुन मिरवणुकीची शोभा वाढविली. 

मिरवणुकीच्या अग्रस्थानी असलेल्या ढोल ताशांच्या तालावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकारात ग्रीन्स वासीयांनी ध्वजनृत्य केले. मावळ्यांच्या पेहेरावातील बाळगोपाळ मंडळींच्या उपस्थितीने मिरवणुकीला वेगळीच शोभा आली. ग्रीन्स मराठी मंडळातर्फे वर्षभर विविध कार्यक्रम व उपक्रम साजरे केले जातात. परभाषीय प्रभावाखाली वाढणाऱ्या हल्लीच्या पिढीबरोबर मराठी भाषेची नाळ कायम जोडलेली राहावी हा ग्रीन्स मराठी, साहित्य, संगीत व कला मंडळाचा मुख्य उद्देश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.