Shivsrushti : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची शिवसृष्टीला भेट

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिवसृष्टीला भेट दिली. शिवसृष्टीचे (Shivsrushti ) पहिल्या टप्प्याचे पूर्ण झालेले काम पाहून जे पी नड्डा यांनी समाधान व्यक्त करीत दुसऱ्या टप्प्याच्या चालू कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. तसेच पुढील वर्षी जून महिन्यामध्ये शिवराज्याभिषेकाच्या ३५० वर्ष सांगता समारंभाच्या प्रसंगी दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण व्हावे, यासाठी केंद्र शासनाकडून व विविध राज्य सरकारांकडून मोलाचे आर्थिक सहाय्य मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

PCMC : रद्दीतून मिळाले कागदांचे 12 रिम मोफत

यावेळी राष्ट्रीय संघटन महामंत्री बीएल संतोष, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळ्, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांसोबतच शिवसृष्टीचे विश्वस्त जगदीश कदम, विनीत कुबेर, सुनील मुतालिक, मनोज पोचट, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यावेळी उपस्थित होते.

पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने न-हे – आंबेगाव येथे ‘शिवसृष्टी’ साकारण्यात येत आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अलौकीक कार्य जगाला ज्ञात व्हावे यासाठी चार भाषांमध्ये माहिती ऐकण्याची सध्याची सोय अन्य जागतिक भाषांचा समावेश करीत आणखी विस्तारावी अशी अपेक्षा बी. एल संतोष यांनी व्यक्त केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.