Alandi News : श्री दत्तनगर प्रतिष्ठान गणेशोत्सव बक्षिस वितरण समारंभ संपन्न

एमपीसी न्यूज  – आळंदीमध्ये श्री दत्त नगर प्रतिष्ठानने  गणेशोत्सव निमित्त संगीत खुर्ची, चित्रकला स्पर्धा, नृत्य स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, लिंबू स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. मुलांमधील व विविध व्यक्तींमधील कला गुणांना वाव मिळावा यासाठी स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते.

दररोज या स्पर्धा पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करीत होते.गुरुवारी (दि.8) बक्षीस वितरण समारंभ झाला. गणेशोत्सवा निमित्त विविध स्पर्धेत भाग घेऊन प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक  मिळवुन यश संपादन केलेल्या लहान व मोठा गटाच्या स्पर्धकांना आकर्षक अशी बक्षीसे, रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. यावेळी श्री दत्तनगर प्रतिष्ठान मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.