CM Eaknath Shinde : जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल; याकूब मेनन कबर प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा

एमपीसी न्यूज – मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याच्या कबरीच्या सुशोभिकरणावरुन राज्यात वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. तसेच जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा दम देखील त्यांनी भरला आहे.

मुंबई  बॉम्बस्फोटप्रकरणातील फाशीची शिक्षा झालेला याकूब मेमन याच्या कबरीचा कोरोनाकाळात झालेल्या सुशोभीकरणास महाविकास आघाडी सरकारची अलिखित परवानगी होती, असा आरोप करीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली. याप्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच याल जो कोणी जबाबदार असेल, त्याची दखल घेत दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली.दहशतवादी विचारांना कोणी संरक्षण देत असेल तर असे लोक समोर आले आहेत, फडणवीसांनी या संबंधी चौकशीचे आदेश दिले आहेत. मी या निर्णयाचे स्वागत करतो, असे मुनगंटीवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.