Khadkwasala Dam News : खडकवासलातून 1,499 क्यूसेक विसर्ग सुरू

एमपीसी न्यूज – खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 100 टक्के भरल्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सकाळी 8.00 वा.1,499 क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे, असे यो. स. भंडलकर, सहाय्यक अभियंता,खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी सांगितले आहे.

खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये गुरुवारी सप्टेंबर आठला रात्री रात्री 11 वाजता 428 क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात येण्याची दाट शक्यता होती.पण काल रात्री 12 वाजता 1712 क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला होता.

तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी, असे भंडलकर यांनी सांगितले आहे.

नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये.नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.