Vadgaon Maval News : वडगाव मध्ये श्रीराम जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील श्रीराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भजन, जन्मोत्सव, सत्यनारायण पूजा, भव्य मिरवणूक काढून जयंती साजरी करण्यात आली.

सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत भजनाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव संपन्न झाला. दुपारी 4 वाजता सत्य नारायण पुजा, सायं 6 ते 9 वाजता श्रीराम प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली, मिरवणुकीत वडगाव मधील गणेश मंडळे व बजरंग मंडळ, उपस्थित होती.

वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष भाऊसाहेब ढोरे, उपनगराध्यक्षा पूनम जाधव, नगरसेवक राजेंद्र कुडे, नगरसेविका शारदा ढोरे, सुनिल चव्हाण, अविनाश चव्हाण, इ. मान्यवर उपस्थितीत होते.

कार्यक्रमाचे नियोजन अंकुश तुमकर, दत्तात्रय तारू, गुलाब शिंदे, मनोहर फाटक, मंगेश धडवले,सचिन पंडागळे, राजेंद्र गायकवाड विकास भोसले, अक्षय पावसकर, शुभम भराडी, दिनेश तारू, प्रणित लोहार,बंटी उडापे, शुभम पानसे व इतर सभासद उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.