Thergaon Crime News : कामगाराने दुकानातील रोकड पळवली, दहा वर्षापासून करत होता दुकानात काम

एमपीसी न्यूज – दहा वर्षापासून दुकानात काम करत असलेल्या कामगार डीस्ट्रीब्युटर्सला द्यायचे पैसे आणि दुकानाच्या गल्ल्यातील रोकड चोरी करून फरार झाला. उत्तम इलेक्ट्रॉनिक्स, थेरगाव या दुकानात 24 ते 27 जानेवारी 2021 या कालावधीत ही घटना घडली.

याबाबत यशपाल हिरालाल चौधरी (वय 41, रा. मातृछाया निवास, डांगे चौक, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून रेवाचंद्र सतार (रा. गजीपुरा, भिनमाल, राजस्थान) विरोधात भारतीय दंड विधान कलम 381 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रेवाचंद्र सतार हा फिर्यादी यांच्या उत्तम इलेक्ट्रॉनिक्स दुकानात 2012 पासून कामाला आहे. आरोपीने एका इसमाला दिलेल्या मालाचे पैसे स्वत:च्या खात्यावर घेतले. तसेच, डिस्ट्रीब्युटर्सला देण्यासाठी दिलेले 40 हजार रूपये आणि दुकानाच्या गल्ल्यातून 36 हजार 960 रूपये असा 76 हजार 960 चोरी केले. आरोपी अटक नाही. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.