Mumbai News आपण मनसेतच राहणार – वसंत मोरे

Mumbai News आपण मनसेतच राहणार – वसंत मोरे

एमपीसी न्यूज – मशिदीवरील भोंग्यागबाबत वेगऴी भूमिका पुण्याचे मनसेचे नेते वसंत मोरे यांची पक्षाच्या शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली.या भेटीनंतर आपण पक्षातच राहणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

आपल्या सर्व शंका दूर झाल्याचे मोरे यांनी यावेऴी सांगितले.पुणे शहराध्यक्षपदावरून हटविल्यानंतर मोरे अन्य पक्षात जाणार अशी चर्चा रंगली होती. तसेच मोरे यांनी आपल्याला शिवसेना,भाजपकडून बोलावणे आल्याचा दावा केला होता. परंतू आता मनसे सोडणार नसल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील नाराजीनाट्यानंतर राज ठाकरे यांनी शहरातील प़मुख नेत्यांना मुबईत बोलविले होते. यात वसंत मोरे यांना निमंत्रण नव्हते.यावेळी शहराध्यक्षपदी साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.