Siddarth Malhotra : ‘तिची’ आठवण आल्यावर पहिल्यांदा ‘शेरशाह’ आठवतो, असं कोण म्हणाला बरं?

Siddarth Malhotra: Who remembers 'Sher Shah' for the first time when he remembers 'her'? कियारा आडवाणी म्हटलं की तुझ्या डोक्यात पहिला शब्द कुठला येतो? चाहत्याच्या या प्रश्नावर सिद्धार्थ मल्होत्रानं ‘शेरशाह’ असं उत्तर दिलं.

एमपीसी न्यूज – बॉलिवूडमध्ये जोड्या जमतात आणि तुटतात देखील. मात्र प्रत्येकवेळी त्याची जोरदार चर्चा होते. एखाद्याची ‘एक्स’ दुस-याची ‘प्रेझेंट’ असते. बॉलिवूडमधील यंग जनरेशन सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा देखील सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो कायम चर्चेत असतो.

मात्र सध्या सिद्धार्थ कथित प्रेयसी अभिनेत्री कियारा आडवाणीमुळे चर्चेत आहे. चाहत्यांसोबत केलेल्या फॅन्स चॅटमध्ये सिद्धार्थला कियाराबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने देखील गंमतीशीर उत्तर दिले.

कियारा आडवाणी म्हटलं की तुझ्या डोक्यात पहिला शब्द कुठला येतो? चाहत्याच्या या प्रश्नावर सिद्धार्थने ‘शेरशाह’ असं उत्तर दिलं. ‘शेरशाह’ हा सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट आहे. हा चित्रपट 1999 साली कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सिद्धार्थ या चित्रपटात विक्रम बत्रा यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर कियारा विक्रम यांच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकणार आहे.

हा चित्रपट येत्या ३ जुलैला प्रदर्शित होणार आहे. परंतु करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे प्रदर्शनाची तारीख आणखी पुढे जाऊ शकते. शिवाय OTT प्लॅटफॉर्मचा मार्ग देखील खुला आहे. अनेक मोठे चित्रपट आता ऑनलाईन प्रदर्शित होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘शेरशाह’ देखील OTT वर प्रदर्शित होऊ शकतो.

‘शेरशाह’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कियारा व सिद्धार्थ एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. याचे बरेचसे चित्रीकरण आफ्रिकेत झाले आहे. परिणामी दोघांनी आफ्रिकेतच नववर्षाचे सेलिब्रेशन केले होते. त्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. यापूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा अभिनेत्री आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.