Alandi News : सिद्धबेटातील वृक्षसंवर्धना करिता पालिके मार्फत कायम स्वरूपी पाण्याच्या नियोजनाची आवश्यकता

एमपीसी न्यूज : सिध्दबेट येथे आरंभ फाऊंडेशन व राष्ट्र संत तुकडोजी महाराज युवक मंच पुणे यांसकडून वृक्षसंवर्धनाचे कार्य होत आहे. सिध्दबेट प्रवेशद्वारा जवळील आस पासचा परिसर वृक्ष संवर्धनासाठी त्यांनी घेतलेला दिसून येत आहे. (Alandi News) सिध्दबेट प्रवेशद्वारा जवळील परिसरात मोठ्या प्रमाणात उंच गवत वाढले होते. तिथे अस्वच्छता होती.आरंभ फाऊंडेशन व राष्ट्र संत तुकडोजी महाराज युवक मंच द्वारे तेथील अस्वच्छता ,गवत काढण्यात आले.त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने योग्य पध्दतीने जमीनीचे सपाटीकरण करून तेथील जागा वृक्ष लागवड लायक केली. त्यांना वृक्षसंवर्धनासाठी सिध्दबेट येथील जागा रानजाई प्रकल्प अध्यक्ष सोमनाथ मुसडगे देहू,जनहित फाऊंडेशनच्या माध्यमातून पालिके तर्फे लाभली.

पालिका व जनहित फाऊंडेशन चे मार्गदर्शन त्यांना लाभत आहे.आरंभ फाऊंडेशन व राष्ट्र संत तुकडोजी महाराज युवक मंच व इतर विविध संस्थांचे वृक्षारोपणासाठी सहकार्य येथे लाभले आहे. येथील वृक्षसंवर्धनासाठी पाण्याची सोय पालिका प्रशासनाच्या वतीने टँकर द्वारे होत होती.परंतु वृक्षांसाठी टँकरच्या पाईपाद्वारे पाणी देणे सोयीस्कर होत नव्हते. येथील दगडी कठड्यांमुळे टँकर वृक्षां लगत पोहचू शकत नसल्याने वृक्षांना पाणी देणे सोयीस्कर जात नसल्याने पाणी टँकर बंद करण्यात आले.

Dehu gaon : वेळेत बांधकाम पूर्ण न केल्यामुळे बिल्डरवर दोन कोटींच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल

सद्यस्थितीत तात्पुरत्या स्वरूपात या वृक्षांना पाणी सिध्दबेट जवळील एका संस्थेच्या कुपनलिकेतून पाईपाद्वारे दिले जात आहे. किंवा सिध्दबेट पर्णकुटी समोर असलेल्या हापश्या द्वारे हपसून बादल्याद्वारें वृक्षांना पाणी दिले जाते. देहू येथे त्यांनी वृक्ष संवर्धनाचे काम हाती घेतले होते तिथे त्यांना तेथील वृक्षांना (Alandi News) पाणी देण्याची कुठलीही समस्या निर्माण झाली नाही.याबाबत ची माहिती राष्ट्र संत तुकोडोजी महाराज युवक मंचच्या वतीने सुरेश देसाई यांनी सांगितली.येथील वृक्ष संवर्धनासाठी पालिके तर्फे कायमस्वरूपी पाईप लाईन करून योग्य त्या ठिकाणी नळ कनेक्शन देऊन येथील वृक्षांसाठी पाण्याची सुविधा करणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.