Nashik News : गायक नरेंद्र चंचल यांच निधन

तूने मुझे बुलाया शेरा वालिए, चलो बुलावा आया है माता ने बुलाया है,

एमपीसी न्यूज : प्रसिद्ध भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन झालं आहे.  चंचल यांनी शुक्रवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. चंचल गेल्या 3 महिन्यांपासून आजारी होते. त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

जेथे नरेंद्र चंचल बराच काळ उपचार घेत होते. नरेंद्र चंचल यांनी अनेक स्तोत्रांसह हिंदी चित्रपटातही गाणी गायली आहेत. ते विशेषतः भजन गीतासाठी परिचित होते.

परिचय : नरेंद्र चंचल यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1940 रोजी अमृतसरमध्ये एका धार्मिक पंजाबी कुटुंबात झाला. ते एका धार्मिक वातावरणात मोठे झाले, ज्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच भजन कीर्तन गाणे आवडत होते. बऱ्याच वर्षांच्या स्ट्रगलनंतर नरेंद्र चंचल यांनी 1973 च्या ऋषी कपूर-डिंपल कपाडिया यांच्या बॉबी या चित्रपटासाठी एक गाणे गायले होते. यासाठी नरेंद्र चंचल यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पुरुष प्लेबॅक पुरस्कार मिळाला. त्याच्याकडे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याचे मानद नागरिकत्वही होते.

लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासोबत गायली गाणी
बॉबी चित्रपटानंतर नरेंद्र चंचल यांनी 1974 मध्ये बेनाम और रोटी कपडा और मकान या चित्रपटासाठी गाणी गायली होती. लता मंगेशकर यांच्यासोबत नरेंद्र चंचल यांनी महंगाई मार गई नावाचं गाणं गायलं होतं. याशिवाय त्यांनी 1980 मध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत तूने मुझे बुलाया शेरा वालिए, 1983 मध्ये आशा भोसले यांच्यासह चलो बुलावा आया है माता ने बुलाया है, दो घूंट पिला के साकिया, हुए हैं कुछ ऐसे वो हमने पराए यासारखी अजराअमर गाणी गायली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.