Eknath Shinde : अयोध्येत उभारणार बाळासाहेब ठाकरे भवन, एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

एमपीसी न्यूज : अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारले जाणार असून त्याला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेअसं नाव दिलं जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. (Eknath Shinde) अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे जागेची मागणी केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच इथे मोठं महाराष्ट्र भवन उभारले जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घेतल,त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अयोध्येत प्रभु रामाचं मंदिर व्हावं, जम्मू कश्मीर मधून 370 कलम हटवलं जावं हे दिवंगत बाळासाहेबांच स्वप्न होतं. ते स्वप्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं.

Tigers in India : भारतात वाघांची संख्या वाढली;पंतप्रधान मोदींनी जाहीर केली आकडेवारी

पण काही लोकांना हिंदूत्त्वाची अॅलर्जी आहे. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदूत्त्वाचे विचार शिकवले. पण इतर धर्माचे अपमान करणारे आमचे हिंदुत्त्व नाही. (Eknath Shinde)  2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात देशात हिंदुत्त्वाचे सरकार स्थापन झाले. मोदींमुळे हिंदुत्त्वाचा जागर झाला. असं म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर कौतुकाचा वर्षावही केला.

आम्ही रामलल्लांच दर्शन घेतलं, इथे आल्यानंतर एक वेगळचं वलय जाणवत आहे. हजारो- लाखोच्या संख्येने लोक आमच्यासाठी इथे आले, त्यांनी केलेल्या स्वागतासाठी मी त्याचे आभार मानतो, अशा शब्दांत त्यांनी अयोध्येतील जनतेचे आभारही मानले. प्रभु रामाच्या चरणांनी पवित्र झालेली ही भुमी आहे.(Eknath Shinde) 14 वर्षे वनवास पुर्ण करुन राम अयोध्येला आले तो दिवस कसा असेल हा विचार करुनच अद्भुत वाटते. अयोध्येतील वातावरण राममय झालं, राममंदिर अस्मितेचा विषय आहे. अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.