Chinchwad : सिटबेल्ट, हेल्मेट न वापरणा-या सव्वापाच हजार चालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज – वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. गेल्या 51 दिवसांमध्ये चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्ट न लावणाऱ्या तीन हजार 358 जणांवर तर दुचाकी चालविताना हेल्मेट न वापरणाऱ्या एक हजार 913 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

बेशिस्त वाहन चालकांमुळे अपघात होतात. या अपघातांमध्ये चारचाकी मोटारीतील प्रवाशांनी सिटबेल्ट न वापरल्यामुळे व दुचाकीच्या अपघातामध्ये हेल्मेट न वापरल्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 1 जानेवारी ते 20 फेब्रुवारी या 51 दिवसांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी सिटबेल्ट न लावणाऱ्या तीन हजार 358 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. या चालकांना सहा लाख 71 हजार 600 रुपयांचा दंड थोटावला आहे.

हेल्मेट न घातल्याबाबत चालकांवर थेट कारवाई न करता त्यांनी एखाद्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्या दंडासह हेल्मेट न घातल्याचाही दंड ठोठावण्यात आला आहे. अशा प्रकारे गेल्या 51 दिवसात दुचाकीस्वारांना नऊ लाख 56 हजार 500 रुपयांचा दंड केल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहन चालकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठीही पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 51 दिवसांमध्ये रॉंग साइटने येणाऱ्या चार हजार 371 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहन चालकांचाही समावेश आहे. या वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी चार लाख 37 हजार 100 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.