Nigdi : लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात सहा महिन्यांपासून फरार आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज – लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात मागील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली.

तुषार अर्जुन कासार (वय 22, रा. वाळकी, ता. जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्यात मागील सहा महिन्यांपूर्वी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यातील आरोपी अद्याप फरार होता. त्याचा शोघ घेत असताना पोलीस नाईक निशांत काळे आणि आशिष बोटके यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी अहमदनगर येथील वाळकी येथे राहत आहे. त्यानुसार, पोलिसांनी वाळकी येथे जाऊन तपास केला असता आरोपी तुषार हा त्याच्या मेव्हण्यांच्या शेतात काम करताना दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक विठ्ठ बढे, पोलीस कर्मचारी अशोक दुधवणे, निशांत काळे, आशिष बोटके यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.