Pune News : खेलो मास्टर्स राज्यस्तरीय एॅथलेटिक्स स्पर्धेत स्नेहा कुदळे, हसीना शेखला दुहेरी मुकुट

एमपीसी न्यूज – खेलो मास्टर्स फेडरेशन आॅफ इंडियाच्या मान्यतेने व खेलो मास्टर्स गेम्स् असोसिएशन महाराष्ट्रच्या वतीने खेलो मास्टर्स राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संदिप म्हाशेरे, अनिल पठाडे, फिरोज शेख, बाबू तांबे यांनी पुरूष गटात तर महिला गटात स्नेहा कुदळे, हसीना शेख यांनी स्पर्धेतील आपआपल्या वयोगटात १०० मीटर धावण्याची शर्यतीत प्रथम क्रमांक जिंकून वेगवान धावपटू होण्याचा मान मिळवला.

भोसरी येथिल संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर येथिल अ‍ॅथलेटिक्सच्या ट्रॅकवर सुरू झालेल्या या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेचे उद्घाटन माजी आॅलिम्पियन बाळकृष्ण आकोटकर, मुष्टीयुध्दातील अर्जुन पुरस्कार विजेते गोपाल देवांग यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अर्जुन पुरस्कार विजेते गोपाल देवांग व राज्य संघटनेचे सचिव अमन चौधरी यांनी ज्योत प्रज्वलीत करून मैदानाला फेरी मारून ती ज्योत प्रमुख पाहुण्याकडे सुपुर्द केली.

या स्पर्धेसाठी खेलो मास्टर्स गेम्स् असोसिएशन महाराष्ट्रचे सरचिटणीस अमन चौधरी, खजिनदार सुनिल हामद, कार्यकारी सदस्य छत्रपती पुरस्कार विजेते स्वामीनाथन, रामदास कुदळे, चंद्रकांत पाटील, शेखर कुदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेत पुरूषांच्या ३० वर्षावरील वयागटात १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पुण्याच्या संदिप म्होरेने ११.८ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंंकले. अहमदनगरच्या विकास परदेशीने ११.९ सेकंदाची वेल नोंदवून रौप्य तर पालघरच्या विशाल शेट्टीने १२.५ सेकंदाची वेळ नोंदवून कास्यदपक जिंकले.

तसेच महिलांच्या ३० वर्षावरील गटाच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पुण्याच्या स्नेहा कुदळेने १५.६ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. पालघरच्या नमिता चौैधरीने (१६.४ सें.) रौप्य तर पुण्याच्या रूपाली मोरेने (१७.२ सें.) कास्यपदक संपादन केले.

या स्पर्धेचे निकाल पुढिल प्रमाणे :

पुरूष गट – १० हजार मीटर धावणे : ४० वर्षांवरील गट 

जयपाल भोईयार (नागपूर, ३५ मिनिट १८.१ से.), अरविंद नलावडे (सांगली, ३९ मि. ४४.५ से.), विवेक पाटील (पुणे, ४२ मि. १६.८ से.)

१०० मीटर धावणे –

३० वर्षावरील गट : संदिप म्हाशेरे (पुणे, ११.८ सें.), विकास परदेशी (अहमदनगर, ११.९ सं.), विशाल शेट्टी (पालघर, १२.५ सें.); ४० वर्षावरील गट : अनिल पठाडे (जळगांव, १२.६ सें.), सुमंगल गावंडकर (पालघर, १३.१ सें.), पराग क्षीरसागर (पुणे, १४.३ सें.); ४५ वरील गट : फिरोज शेख (बुलढाणा, १२.५ सें.), रूपेश म्हात्रे (१३.९ सें.), राजेश मराठे (१४.१ सें.); ५५ वर्षावरील गट : बाबू तांबे (पुणे, १३.२ से.ं), आक्रम खान (नागपूर, १३.५ सें.), तुकाराम पाटील (ठाणे, १४.१ सें.)

४०० मीटर धावणे –

३० वर्षावरील गट : संदिप म्हाशेरे (पुणे, ५७.६ सें.), सचिन नेरकर (जलगांव, ६३.७ सें.), प्रकाश शहा (पालघर, ६५.० सें.); ३५ वर्षावरील गट : भगवान वाघमारे (पुणे, ६५.३ सें.), सचिन पाटील (पालघर, ६६.० सें.), ज्ञानेश्वर चिमंते (पुणे, ७३.० सें.); ४५ वर्षावरील गट : जयंत शिवडे (सातारा, ६५.१ सें.), दिलिप डोके (पुणे, ६५.७ सें.), राजेश मराठे (पालघर, ६९.३ सें.)

भालाफेक –

३० वर्षावरील गट : अभिजीत गायकवाड (४०.१४ मीटर.), प्रतिक खांदेशे (२८.६० मीटर ) शेख समसुद्दीन (२२.८७ मीटर); ३५ वर्षावरील गट : निलेश गुप्ता (२१.३८ मीटर), रंजीत सावंत (२०.९६ मीटर), अमोल घोडके (१३.१४ मी.); ४० वर्षावरील : सुनिल महामुणकर (३५.५८ मीटर), अजित पवार (२४.८८ मी.),अजय आडकर (४.३ मी.)

लांब उडी –

३० वर्षावरील गट : विकास परदेशी (अहमदनगर, ५.८० मी.), गणेश पांडियन (पुणे, ५.५० मी.), नितिन दास (पुणे, ४.७७ मी.)

महिला : दहा हजार मी. धावणे  –

३५ वर्षावरील गट : सीमा वर्मा (मुंबई, ५१ मि. १६.३ सें.), प्रिया मिश्रा (ठाणे, ५६ मि. ४७.०० सें.), पल्लवी हंडवळे (पुणे, ५९ मि. ०६.४ सें.)

१०० मीटर धावणे –

३० वर्षावरील गट ; स्नेहा कुदळे (पुणे, १५.६ सें.), नमिता चौधरी (पालघर, १६.४ सें.), रूपाली मोरे (पुणे, १७.२ सें.); ३५ वर्षावरील गट : हसीना शेख (पुणे, १६.९ सें.), विजेता शेख (मुंबई, १७.३ सं.), दिपाली किरदल (सातारा, १८.५ सें.)

लांब उडी –

३० वर्षावरील गट : स्नेहा कुदळे (पुणे, ३.७५ मी.), शैला यादव (अहमदनगर, (३.० मी.), स्वाती शिंदे (पुणे, २.६० मी.); ३५ वर्षावरील गट : हसीना शेख (पुणे, ३.२२ मी.), पंचफूला देशमुख (नांदेड, ३.०८ मी.), विजेता शेख (पुणे, २.९९ मी.)

भालाफेक –

४० वर्षावरील गट : हेमा लिसबो (पालघर, १९.६९ मी.), मनिषा सातपूते (पुणे, १५.४७ मी.), सीमा मिंधे (पुणे,१३.४० मी.)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.