India Corona Update : कोरोनाचा आलेख उतरणीला, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 247 दिवसांतील निचांकी

एमपीसी न्यूज – भारतातील कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 12 हजार 830 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 14 हजार 667 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 1 लाख 59 हजार 272 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हा मागील 247 दिवसांतील नीचांक आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 42 लाख 73 हजार 300 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 36 लाख 55 हजार 842 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.20 टक्के एवढा झाला आहे.

 

देशात गेल्या 24 तासांत 446 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे देशात आजवर 4 लाख 58 हजार 186 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 60.83 कोटी नमूने तपासण्यात आले आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 106 कोटी 14 लाख नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.