Pune News : पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला, 6 मजूर जखमी

एमपीसी न्यूज – पुण्याच्या बालेवाडी परिसरात एका निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा मजूर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. अचानक स्लॅब कोसळल्यामुळे काही मजूर ढिगाऱ्याखाली दाबले गेले होते. त्यातील सगळ्यांना जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास बालेवाडी परिसरातील निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. काही तासात हे बचावकार्य पूर्ण झाले. स्लॅब कोसळल्यानंतर खाली दबलेल्या सहा ते आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

Hinjawadi slab collapse

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले तेव्हा स्लॅबचा संपूर्ण लोखंडी सांगाडा खाली कोसळला असल्याचे दिसून आले. या लोखंडी स्लॅब खाली दबल्याने तब्बल सहा कामगार जखमी झाले होते. त्यातील सहा जणांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी पुणे, पिंपरी-चिंचवड, आणि पीएमआरडीएच्या सहा फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. प्रशासनाकडून मात्र या घटनेविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.