Lonavala : सामाजिक न्याय विभागातून सर्वसामान्यांना व्यवसायाकरिता भांडवल

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातून सर्वसामान्य नागरिकांना उद्योग व्यवसायाकरिता भांडवल उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष तथा रिपाई महाराष्ट्र राज्य रोजगार समितीचे अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांनी दिले. 

रिपब्लिकन पार्टीचा मेळावा नुकताच लोणावळ्यात पार पडला. यावेळी बोलताना वाघमारे म्हणाले यावर्षी रिपब्लिकन पक्षाचा 61 वा वर्धापनदिन आहे. यानिमित्त सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या व्हेंच्युर कॅपिटल फंड या सरकारी योजनेमधून पुणे जिल्ह्यात 61 कोटी रुपयांचे भांडवल सामान्य नागरिकांना कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

मावळ तालुका रिपाईचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांनी मावळ तालुक्यात रिपब्लिकन पक्ष घराघरात पोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संभाजी साळवे, जिल्ह्याचे नेते खंडूशेठ जाधव, गणेश गायकवाड, अशोक गायकवाड, संजय अडसुळे, शिवाजी मखरे, धम्मरक्षित  जाधव, लोणावळा शहराध्यक्ष कमलशिल म्हस्के, नगरसेवक दिलीप दामोदरे, वसंत देसाई, अशोक सरवदे, रवींद्र गायकवाड, अनिल वाघमारे, मिलिंद भालेराव, चंद्रकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.