Lonavala : सिंहगड महाविद्यालयात B++ नॅक मानांकन

एमपीसी न्यूज – कुसगाव गावातील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल्स सायन्सेस या महाविद्यालयाला नुकतेच नॅकचे बी प्लस प्लस (B++) हे मानांकन प्राप्त झाले आहे. 

महाविद्यालयांना आपला दर्जा सिद्ध करण्याकरिता नॅक मानांकन फार महत्वाचे असते. हे मानांकन मिळविण्याकरिता सिंहगड महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेसोबत उच्च शिक्षित व शिस्तप्रिय अनुभवी प्राध्यापक वर्ग, जगातील नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांची होणारी प्लेसमेंट, प्रशस्त इमारत व अद्यावत खेळाची मैदाने, आधुनिक तंत्रज्ञान, अद्यावत प्रयोगशाळा या सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

याशिवाय महाविद्यालयाला मिळालेली विविध मानांकने या सर्व बाबीचा नॅक समितीने अभ्यास व पाहणी करत सदर मानांकन दिले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.जे. ओसवाल यांनी दिली. महाविद्यालयाला मिळालेल्या या यशाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. एस. गायकवाड व पदाधिकारी यांनी कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.