Lonavala : बैलपोळ्याकरिता मातीचे बैल बाजारात दाखल

एमपीसी न्यूज – भाद्रपद अमावस्येच्या दिवशी सर्वत्र बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो. वाढत्या नागरिकरणामुळे शहरी भागात तसेच ग्रामीण भागात देखिल खर्‍याखुर्‍या बैलाची संख्या कमी झाली असल्याने बाजारपेठत कृत्रिम मातीच्या बैलजोड्या विक्रीकरता दाखल झाल्या आहेत.

अवघ्या 50 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत विविध आकाराच्या आकर्षक बैलजोड्यांनी बाजारपेठा बहरल्या आहेत. ग्रामीण भागात बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना चांगल्या पद्धतीने सजवत त्यांना गोंडे तसेच फुगे बांधत त्यांची ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. खेडेगावात हा उत्सव पाहण्यासारखा असतो. शहरी व निमशहरी भागात जागेअभावी बैलांची संख्या कमी झाली आहे. अशा ठिकाणी मातीचे बैल घेऊन जाऊन त्यांची पुजा केली जातो. नवरात्र उत्सव तसेच बैलपोळ्याकरिताचे साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने लोणावळ्याची मुख्य बाजारपेठ गजबजली आहे. साहित्य खरेदीकरिता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.