Lonawala Crime : मुलानेच केला वडिलांचा खून; आरोपी लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या सापळ्यात

एमपीसी न्यूज  : वडील व मुलगा यांच्यात झालेल्या भांडणानंतर मुलानेच वडिलांचा गळा आवळून खून केला व पलायन केले होते. याबाबत मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खूनाचा (Lonawala Crime) गुन्हा दाखल करण्यात आला होता. पवनानगर विभागातील जवण नं. 3 या गावामध्ये दि. 14 ते 17 जुलै दरम्यान ही घटना घडली होती.

या घटनेतील मृत व्यक्ती खंडू उर्फ गोट्या भिकाजी गिरंजे (वय 60, रा. जवण नं. 3, पवनानगर, ता. मावळ) यांची व त्यांचा मुलगा शेखर खंडू उर्फ गोट्या गिरंजे (वय 35, रा. खडकपाडा, कल्याण पश्चिम, जि. ठाणे, मूळ राहणार जवण नं. 3) यांच्यात दारु पिऊन झालेल्या भाडणांमध्ये शेखरने वडील खंडू यांचा गळा (Lonawala Crime) आवळून खून केल्याची फिर्याद सखाराम गिरंजे (वय 67, रा. जवण नं. 3) यांनी दिली होती.

Crime News : डि-मार्टसाठी आलेला साडेतीन लाखांचा माल चोरीला

या फिर्यादीच्या आधारे व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज बनसोडे, पोलीस अंमलदार संतोष शेळके, नितिन कदम, शरद जाधवर, केतन तळपे, संदीप बोराडे, प्रविण उकिर्डे यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने शेखर यास विश्वासात घेऊन तपास केला असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.  याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने पुढील तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.