Crime News : डि-मार्टसाठी आलेला साडेतीन लाखांचा माल चोरीला

एमपीसी न्यूज –  मोशीतील डि-मार्टच्या शोरूमसाठी आलेला तब्बल साडेतीन लाखांचा माल (Crime News) चोरीला गेला आहे. हा प्रकार रविवारी (दि.18) पहाटे साडेतीन वाजता चिंचवड येथील स्पाईन रोडवर घडला आहे.

 

विजय अरविंद पराडे (वय 43 रा.रुपीनगर, तळवडे) यांनी पोलीसात तक्रार दिली असून अज्ञात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Crime News : अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास ठोकल्या बेड्या;70 सीसीटीव्हीची केली कसून तपासणी

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टेम्पो चालक असून त्यांनी त्यांच्या टेम्पो (एमएच.04 एचडी 2564) मध्ये मोशी येथील डिमार्टसाठी माल आणला होता. टेम्पो सील (Crime News) स्वरूपात असताना तो त्यांनी स्पाईन रोडवरील अश्विनी ह़ॉस्पीटलच्या शेजारी उभा केला होता. यावेळी चोरट्यांनी फिर्यादीच्या  टेम्पोला उलटा टेम्पो पार्क करून सील तोडून टेम्पोतील माल स्वतःच्या टेम्पोत भरला व आरोपी पसार झाले. यामध्ये तब्बल 3 लाख 47 हजार 23 रुपयांचा माल चोरीला गेला आहे. चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलीस चॉकलेटी रंगाच्या आयशियर कंपनीच्या टेम्पोटा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.