Hinjewadi News : हिंजवडी ग्रामपंचायतीने हौसिंग सोसायटींचा कचरा उचलणे थांबविल्याने नागरीक त्रस्त

एमपीसी न्यूज – हिंजवडी ग्रामपंचायतीने हौसिंग सोसायटींचा कचरा उचलणे थांबवल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.हिंजवडी ग्रामपंचायतीने सर्व हौसिंग सोसायटींना (Hinjewadi News) नोटीसा पाठवून कळवले की, आपल्या सोसायटीमधून दैनंदिन निघणारा ओला व सुका कचरा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे दैनंदिन कचऱ्याची विल्हेवाट स्वतः लावावी.

ब्ल्यू रीज हौसिंग सोसायटीचे रहिवासी समरेश रंजन यांनी सांगितले की, त्यांच्या सोसायटीला अशी नोटीस मिळाली आहे. ते म्हणाले की ग्रामपंचायतीला आम्ही सर्व सदनिकाधारक मालमत्ता कर भरतो. ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे आमच्याकडून कचरा गोळा करून त्याची योग्य पद्धत्तीने विल्हेवाट लावण्याची.

 

Pavana Dam : पवना धरणातील पाणीसाठा 70.42 टक्क्यांवर

 

दिनेश मांढरे, अशोक मिडोजचे मावळते चेअरमन म्हणाले की, आमच्या (Hinjewadi News) सोसायटीमध्ये 336 सदनिका आहेत. आम्ही आमचा ओला कचरा प्रक्रिया करून त्याचे खत बनवून त्याची विल्हेवाट लावतो. ग्रामपंचायतीने आम्हाला नोटीस पाठवल्यानंतर 8 दिवस सुका कचरा उचलला नसल्यामुळे तो साठलेला आहे.

ग्रामपंचायत आम्हाला पाणी पुरवठा करीत नाही. रस्ते पण खराब आहेत. त्यांनी आमचा सुखा कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावली पाहिजे.

एस्पिरिया हौसिंग सोसायटीचे चेअरमन पंकज जाधव म्हणाले की, केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे आमची सोसायटी ओला व सुका कचरा वेगळा गोळा करत आहे. ओला कचरा आम्ही प्रक्रिया करून खत तयार करून त्याची विल्हेवाट लावतो. सुका कचरा

 

ग्रामपंचायतने उचलायला पाहिजे व त्याची विल्हेवाट लावली पाहिजे.आमच्या (Hinjewadi News) सोसायटीला नोटीस मिळाल्यानंतर ग्रामपंचायतने सुका कचरा उचलणे बंद केले आहे. त्यामुळे कचरा साठला होता.आज सकाळी स्थानिक लोक प्रतिनिधीबरोबर बोलल्यानंतर आज कचरा उचलण्यात आला.

 

मांढरे व जाधव म्हणाले की, ग्रामपंचायतने सोसायटींचा सुका कचरा उचलला पाहिजे. ग्रामपंचायतने तसे पत्र सर्व सोसायटींना पाठवले पाहिजे.

 

विश्वनाथ रायकर, ग्राम विकास अधिकारी, हिंजवडी ग्रामपंचायत म्हणाले की, ग्रामपंचायतच्या वतीने सर्व सोसायटींच्या प्रतिनिधिबरोबर कचरा प्रश्नावर संवाद साधला जाईल. त्यांना त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट स्वतः लावण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल. ते पुढे म्हणाले की, आम्ही त्यांच्या अडचणी समजून घेऊ व त्यातून मार्ग काढण्यात येईल.

 

 

 

 

हिंजवडी आयटी पार्क झाल्यामुळे गेल्या 10 ते 15 वर्षात हिंजवडी गावाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. येथे छोट्या मोठे गृह प्रकल्प उभारण्यात आले. तसेच ग्रामस्थांनी देखील इमारती बांधून त्यामध्ये पीजी हॉस्टेल सुरु केले. त्यामुळे गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याच्याबरोबरच कचरा उत्पादन ही वाढले. यामुळे ग्रामपंचायत पुढे कचरा विल्हेवाटीचा  मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.