Crime News : अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास ठोकल्या बेड्या;70 सीसीटीव्हीची केली कसून तपासणी

 एमपीसी न्यूज – थेरवाग येथे उद्यानात खेळत असणाऱ्या सात वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास वाकड पोलिसांनी 16 तासात बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार थेरगाव येथील बापूजीबुआ (Crime News) उद्यान येथे रविवारी (दि.17) सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान घडला.

अलिम मुसा शेख (वय 27 रा. काळेवाडी) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडित मुलाच्या आईने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगा हा रविवारी बागेत खेळ्यासाठी गेला असता दाढी व मिशी असणाऱ्या अनोळखी इसमाने चॉकलेटचे आमिष दाखवून मुलालाजवळ बोलावले. यावेळी त्याने मुलाला जवळच्या झाडीत नेऊन त्याच्यावर अत्याचार केले.  मुलाने आपल्या आईला हा प्रकार (Crime News) सांगितल्यानंतर घटना समोर आली होती.

 

 

 

PMPML : पीएमपीएलचा ब्रेक फेल, चालकाने प्रसंगावधान राखून कठड्याला गाडी धडकवली, 6 प्रवाशी जखमी

 

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पिडित मुलाने सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. यासाठी पोलिसांनी बागेच्या आसपासच्या परिसरातील दुकान,हॉटेल यांचे असे एकूण 70 सीसीटीव्ही तपासले. यामध्ये संशयित दिसला. त्यानुसार कसून तपास केला असता तो काळेवाडीचा राहणार असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी 16 तास तपास करून आरोपीला अटक केली. आरोपी (Crime News) हा विवाहीत असून त्याचा एक अपत्य देखील आहे. मात्र मागील चार वर्षांपासून त्याची पत्नी त्याच्या सोबत रहात नाही. पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.