Bhosari News : भोसरीतील 418 मतदान केंद्रावर रविवारी आधार जोडणीसाठी विशेष मोहिम

एमपीसी न्यूज – भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार मतदारांकडून निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करण्याकरिता भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्व 418 मतदान केंद्रावर येत्या रविवारी (दि.11) ऐच्छिक तत्वावर निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करिता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हावे.निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करुन घ्यावे, असे आवाहन भोसरी विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी, उपजिल्हाधिकारी डॉ. राणी ताटे यांनी केले.

207 भोसरी विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, सिताराम बहुरे, नायब तहसीलदार सुरेश पिसाळ, पांडुरंग पवार, अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांची आज (गुरुवारी) बैठक संपन्न झाली.भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण 418 मतदान केंद्र आहेत.या ठिकाणी व मतदार नोंदणी कार्यालय, राजीव गांधी माध्यमिक विद्यालय, नवीन इमारत पहिला मजला, नेहरुनगर या ठिकाणी रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत ऐच्छिक तत्वावर आयोजन करण्यात आले आहे.

त्या ठिकाणी बी.एल.ओ.उपस्थित राहून मतदारांचे निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करुन देणार आहेत.तसेच http://nvsp.in किंवा http://voterportal.eci.gov.in किंवा Voter Helpline App या माध्यमाद्वारे मतदारांना निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.