Khadki : कॅन्टोन्मेंट आणि खडकी येथे रहिवासी परिसर विलीनीकरण लवकर करा, अन्यथा निवडणुका घ्या – आप

एमपीसी न्यूज : पुण्यातील कॅन्टोन्मेंट व खडकी या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका काल (Khadki) अचानक रद्द झाल्या. दोन वर्षापेक्षा अधिक काळ या ठिकाणी निवडणूक न झाल्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्यांना उत्तरे मिळत नाहीत, तसेच सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्डला जीएसटीमध्ये वाटा मिळत नसल्यामुळे निधी कमतरता ही मोठी समस्या आहे.

त्यामुळे अनेक विकास कामे रखडली आहेत. त्यावर आवाज उठवला जात नाही. कॅन्टोन्मेंटमधील काही रहिवाशी भाग महानगरपालिकेला जोडले जाणार अशी चर्चा अनेक वर्षांपासून आहे. परंतु, त्याबाबत निश्चित असे धोरणात्मक निर्णय घेतले जात नाहीत. त्यामुळे खडकी सारख्या कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये तर नागरी लोकसंख्या कमी होत चाललेली दिसते आहे.

Pune : ‘दगडूशेठ’च्या संगीत महोत्सवात दिग्गजांचे सादरीकरण अनुभवण्याची पर्वणी

जुन्या इमारतींचे बांधकाम रखडलेले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालय याबाबतीत अत्यंत ढिसाळ (Khadki) असल्याने आणि आता लोकप्रतिनिधी नसल्याने जनतेच्या समस्या सुटत नाहीत, निर्णय घेतले जात नाहीत. निवडणूक झाल्यावरही विलीनीकरण शक्य आहे. परंतु, लोकशाहीपेक्षा एकाधिकारशाहीवर केंद्रातील भाजपची जास्त भिस्त असल्याने कॅन्टोन्मेंट निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत, असा आरोप आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

रहिवासी परिसर विलीनीकरण लवकर करा, अन्यथा निवडणुका घ्या व या बाबतची भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.