Startup conclave 2022 : ‘स्टार्टअप कॉन्क्लेव्ह 2022’ उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे आणि डीपीयू फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड एंटरप्रेन्योरशिप (डीपीयू एफआयआयई) यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय “स्टार्टअप कॉन्क्लेव्ह” आयोजित करण्यात आले होते. स्टार्टअप कॉन्क्लेव्ह 2022 या उपक्रमाच्या माध्यमातून (Startup conclave 2022) डॉ. डी. वाय. पाटील विदयापीठ, पुणे द्वारे विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्णेतेसह उद्योजकता विकास साद्य करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा उद्देश तसेच भविष्यात नवउद्योजक होण्याची संधी खुणावत असल्याने कॉनक्लेव्हमध्ये तरुणांचा उत्साहपूर्ण सहभाग पहावयास मिळाला.

‘स्टार्टअप कॉनक्लेव्ह 2022’ पिंपरीतील संत तुकारामनगर, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ ऑडोटिरिअमध्ये पार पडला. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय विभागाचे चीफ इनोव्हेशन ऑफिसर डॉ. अभय जेरे हे कॉन्क्लेव्हचे प्रमुख पाहुणे होते. समवेत दीपप्रज्वलनावेळी डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी.पाटील, कुलगुरु एन. जे. पवार, प्र-कुलपती डॉ.भाग्यश्री पाटील, बीव्हीजी इंडियाचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हनुमंतराव गायकवाड, विश्वस्त आणि कार्यकारी संचालिका डॉ. स्मिता जाधव, कुलसचिव ए.एन. सूर्यकर, सल्लागार डॉ वाय. एम. जयराज, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, खजिनदार डॉ. यशराज पाटील उपस्थित होते.

अभय जेरे म्हणाले, ‘2047 पर्यंत विकसित देशांच्या यादीमध्ये भारत दाखल होण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रभावी संकल्पना समोर येणे आवश्यक आहे.(Startup conclave 2022) गिग इकोनॉमीची सुरुवात समाजाच्या प्रगतीकरिता करण्यासाठी विधायक कौशल्ये, सृजनात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. स्टार्टअप जगतात जे उद्योजक अपयशी झाले आहेत, त्यांच्यासोबत काय करु नये याबाबत संवाद साधून योग्य पावले उचलणे गरजेचे आहे.

Indrayani college : अंतर महाविद्यालयीन खो खो स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाला यश

जेरे म्हणाले, प्रत्येक प्रॉडक्ट लाँच करताना प्रॉडक्ट डिझाइन व प्रॉडक्ट इंजिरिअरिंग दृष्ट्या या विषयांचा सखोल अभ्यास प्रत्येक स्टार्टअपच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे. कोणत्याही स्टार्टअपचा मूळ हा सुइच्या ठिकाणी सुइप्रमाणेच असायला हवा. स्टार्टअपमधील प्रत्येक समस्येवर टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने अडचणी शोधून त्याच्या समस्यांचा शोध घ्यायला हवा. स्टार्टअपचे प्रॉडक्ट हे दिसायला देखील चांगले हवेत जसे की,चायनाचे प्रॉडक्ट आहेत.(Startup conclave 2022) बिझनेस हा बोथट असतो. तसे पैशाशिवाय होवू शकत नाही. परंतु, तुमच्यामध्ये पैसा निर्माण करण्याची क्षमता असायला हवी. चायनामध्ये दरवर्षी सर्वाधिक 16 लाख पेटंट फाइल होत आहेत. तर, अमेरिकेत 7 लाख व भारतामध्ये 55 हजार पेटंट फाइल होत आहेत. त्यासाठी भविष्याची गरज ओळखून तुम्ही कसे विचार करता यापेक्षा ते विचार पुढे कसे नेता येतील हे महत्त्वाचे आहे.

डॉ. पी.डी.पाटील म्हणाले, ‘विद्यापीठात अनेक नवनवीन कल्पना आहेत. विद्यापीठ A++ ग्रेडसह नॅक मान्यताप्राप्त आहे. एनआयआरएफ 2022 च्या श्रेणीमध्ये 41 वे, वैद्यकीय श्रेणीमध्ये 17 वे, दंत श्रेणीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक साधन (Startup conclave 2022) सामग्रीसह अत्याधुनिक पायाभूत सुविधा विद्यापीठात उपलब्ध आहेत. त्याचा मुलांनी सुयोग्य वापर करावा. मुलांनी केवळ उजव्या मेंदूचा वापर न करता डाव्या मेंदूचाही वापर करावा. तर, यश निश्चित आहे.’

डॉ. एन. जे. पवार म्हणाले, ‘विद्यापीठाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 40 पेटंट अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 4 पेटंट मंजूर आहेत. सध्या 49 कॉपीराईट नोंदणीकृत आहेत. हणमंतराव गायकवाड म्हणाले, ‘फक्त उत्तम न होता सर्वोत्तम होण्याचा ध्यास हा यशाचा एकमेव मार्ग आहे. आपल्या कल्पना तत्काळ पद्धतीने अंमलात आणणे हा कोणत्याही उद्योजकासाठी यशाचा मंत्र आहे.’

वक्ते डॉ. मुग्धा लेले यांनी कोणत्याही व्यवसायाची संकल्पना प्रत्यक्षात आणून त्याची अंमलबजावणी कशी करावी याविषयी सांगितले. तर, वक्ते धनंजय सातारकर यांनी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैशाचे मोल कितपत आहे याविषयी सांगितले.

डीपीयू फाउंडेशन फॉर इनोव्हेशन, इनक्यूबेशन ॲंड आंत्रप्रिन्योरशिप यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. स्वरदा पिरण्णावर यांनी उत्कृष्ट संयोजन केले. प्रतिमा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. पार्थ आफळे यांनी आभार मानले.

डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या डीपीयू फाउंडेशन फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन ॲंड आंत्रप्रिन्योरशिप सेंटरच्यावतीने आयोजित ‘स्टार्टअप कॉनक्लेव्ह 2022’  (Startup conclave 2022) मध्ये सिमॅसेस इंटरनॅशनल इंटरडिसीप्लिनरी लर्निंग सेंटरमधील (एसआयआयएलसी) ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उद्योजक जगतात भरारी घेण्यासाठी मुलांना या कॉनक्लेव्हची मोलाची मदत झाली. विद्यार्थ्यांना उद्योग जगतात भरारी घेण्यासाठी अडचणीवर नेमकी कशी मात करावी याविषयी संबोधन केल्याने मुलांच्या कौशल्याला वाव मिळाला. इनक्युबेशन सेंटरचा फायदा मुलांना भावी उद्योजक घडण्यासाठी होणार असल्याचे मत ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटच्या शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. मंजूषा मोरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.