Indrayani college : अंतर महाविद्यालयीन खो खो स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाला यश

एमपीसी न्युज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वर नगर, (Indrayani college) बारामती आयोजित अंतर महाविद्यालयीन खो खो (मुली) स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या संघाने चमकदार कामगिरी केली. इंद्रायणी महाविद्यालयाच्या संघाने स्पर्धेत सर्वसाधारण उपविजेतेपद मिळविले.

महाविद्यालयाच्या या यशा बद्दल खो खो खेळाडूंचे अभिनंदन. विशेष करून प्रियांका इंगळे, रुतीका राठोड, साक्षी शेंडगे यांनी महाविद्यालयाच्या यशात भरीव योगदान दिले.

या यशामागे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे व सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालय विकास समिती सदस्य यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के मलघे यांचे प्रोत्साहन व विश्वास विद्यार्थिनींनी सार्थ ठरविला.

Talegaon-Dabhade : आपल्या कामाला छंद बनवा – संजय भास्कर जोशी

विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देणारे दूरदृष्टी असणारे क्रीडा प्रेमी संस्थेचे (Indrayani college) अध्यक्ष रामदास काकडे व दैनंदिन प्रश्न तातडीने सोडविणारे कार्यवाह चंद्रकांत शेटे व विद्यार्थि प्रिय प्राचार्य  डॉ. एस के मलघे व सर्व प्राध्यापकांचे सहकार्य यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.